आयुष्य
आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वसामान्य तरुणाईला पडलेला प्रश्न म्हणजे मी जगावं कसं हा प्रश्न आहे की समस्या तर आयुष्यात जगता- जगता स्वप्न ,यश ,भविष्य ,यांचा शोध घेता आपण स्वतःलाच विसरून जातो
कधी स्वतःला वेळ दिला तर दुखी होऊन बसतो कारण आपण जगताना किंवा वावरताना इतके पुढे गेलेले असतो की आपण आयुष्यात हे सर्व मिळविण्यासाठी केलेला त्याग आणि सोडलेल्या गोष्टी यांची जेव्हा जाणीव होते ना तेव्हाच खऱ्या आयुष्याचा अर्थ बोध होतो
विषयाचं नाव' मी 'जगावं कसं
अहो जगणं एक लगोरी खेळ आहे त्या खेळामध्ये टिकून राहायचं की जीवनाच्या सोंड्या टिपता टिपता बाहेर पडायचं हे आपल्यावर आहे परंतु टिकून राहिले तरी बाहेर पडायचंच आहे मग जर आयुष्य जगायचं असेल तर असं जगा जो एक अनुभव देऊन जाईल असा अनुभव जो क्षण तुम्ही जगले ना ते क्षण जीवनातील सर्वात सुखदायक क्षण असतील
कारण आजची जीवनशैली ही फक्त यशावर अवलंबिलेले आहे प्रत्येकाला यश हवय परंतु यश मिळत असताना कोणालातरी अपयशाला सामोरे जावे लागते म्हणून आपल्या पदरी यश पडलेले असेल याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे आयुष्याची रोजची रुटीन तोत तोच पण आहे आपला आयुष्य गुंतवून टाकतो आपण आयुष्यात यशाच्या वाटेवर जेव्हा चालत असतो तेव्हा त्या वाटेवर आपलं अस्तित्व निर्माण करणारे (हात )आई-वडील थकले त्यांची पावलं आता अडखळती झाली येत आज त्या हातांना त्या डोळ्यांना आपली गरज आहे त्यात थकणाऱ्या हातांचा आणि लवलवत्या पायांचा आधार बना आयुष्य खूप छोटे आहे आलेल्या वादळाप्रमाणे कधी निघून जाईल माहिती नाही म्हणून
आपलं व्यस्त राहणं कोणासाठी तरी काटेरी कुंपण बनून जातात ज्याचे काटे आपल्या जास्तीत्व त्यांना बसत असतात याची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा सगळं निघून गेलेले असतं तेव्हा खरं आयुष्य कळतं जेव्हा आपण सक्सेस असतो हवं ते मिळालेले असतं मात्र आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आनंद मात्र कुठेच नसतो आणि कुठेतरी भरमसाठ हसू असतानाही मन रडत असतं ते रडणं जाणार ही कोणीच नसतं कारण आपण त्यांना तेव्हाच गमावलेलं असतं जेव्हा आपण यशाच्या पायरीवर पावलं टाकत असतो
चेहरा असतो काही लोकांचा हसमुख परंतु त्या मागे लपलेला असते खूप मोठे दुख
प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामध्ये एखादी गोष्ट लपलेली असते
कोणाचा आनंद तर कोनाच्या आसवांची नदी वाहत असते
दुःख संपवण्यासाठी आयुष्य संपवणे हा पर्याय नसतो आयुष्याचा प्रत्येक क्षण हिमतीने लढून जगायचं असतं
Anitakarandeblogger.com
new post जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही हात नकळत पण जे हात आहेत सोबत त्यांना कधीच सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील पण तुम्ही मात्र हसणं विसरू नका
धन्यवाद
Comments
Post a Comment