Posts

Showing posts from September, 2022

आयुष्य

  आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वसामान्य तरुणाईला पडलेला प्रश्न म्हणजे मी जगावं कसं हा प्रश्न आहे की समस्या तर आयुष्यात जगता- जगता  स्वप्न ,यश ,भविष्य ,यांचा शोध घेता आपण स्वतःलाच विसरून जातो कधी स्वतःला वेळ दिला तर दुखी होऊन बसतो कारण आपण जगताना किंवा वावरताना इतके पुढे गेलेले असतो की आपण आयुष्यात हे सर्व मिळविण्यासाठी केलेला त्याग आणि सोडलेल्या गोष्टी यांची जेव्हा जाणीव होते ना तेव्हाच खऱ्या आयुष्याचा अर्थ बोध होतो विषयाचं नाव' मी 'जगावं कसं अहो जगणं एक लगोरी खेळ आहे त्या खेळामध्ये टिकून राहायचं की जीवनाच्या सोंड्या टिपता टिपता बाहेर पडायचं हे आपल्यावर आहे परंतु टिकून राहिले तरी बाहेर पडायचंच आहे मग जर आयुष्य जगायचं असेल तर असं जगा जो एक अनुभव देऊन जाईल असा अनुभव जो क्षण तुम्ही जगले ना ते क्षण जीवनातील सर्वात सुखदायक क्षण असतील कारण आजची जीवनशैली ही फक्त यशावर अवलंबिलेले आहे प्रत्येकाला यश हवय परंतु यश मिळत असताना कोणालातरी अपयशाला सामोरे जावे लागते म्हणून आपल्या पदरी यश पडलेले असेल याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे आयुष्याची रोजची रुटीन तोत तोच पण आहे आपला आयुष्य गुंतवून ...