जन्म एक श्राप
आपण माणसं नेहमी समाज – समाज करत असतो. पण या समाजात आपण फक्त स्त्री आणि पुरूष असंच आणि एवढंच विभाजन करत असतो. खरंतर घरातून, शाळेतून लहापणापासूनच आपल्याला समाज म्हणजे स्त्री – पुरूष हेच समीकरण शिकवलं जातं. या बेरजेत आपण आजही तृतीयपंथीयांना घ्यायला विसरतो. त्यातही एकवेळेस आपण दुसऱ्याच्या घरातल्या एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकारू शकतो. पण स्वत:च्याच घरात ती व्यक्ती असेल तर तो आपल्या मानहानीचा, लज्जेचा विषय ठरतो. एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या तृतीयपंथी व्यक्तीला आपण तोंडावर दाखवण्यासाठी आदर देतो. पण त्यांच्याच मागे त्यांच्या ‘असण्यावर’ आपण हसत असतो आणि मी असं म्हणू शकते. कारण मी अशा अनेक हसणाऱ्या लोकांना बघितल आहे. अर्थात याला काही अपवाद देखील असतात. काही लोक खरंच मनापासून त्यांना आदर देतात. पण तृतीयपंथीयांना या पुर्ण समाजाकडून आदर, सन्मा "मी मानव जातीी जन्म तर घेतला पण माझा शरीर मात्र दोन जिवां बनला त्यात न श्री होती न पुरुष मी जिथे जातो समाज तेथून सरतो मी शाळेत गेलो तर कोणत्या बाथरूूम मध्ये जायचंं एकीकडे लेडीज तर दुसरीकडे जेंट्स मग मी कुठे मला माझ्या अस्तित्वा...